डॉ. ओक यांना केईएमचा पाठिंबा

June 20, 2012 4:30 PM0 commentsViews: 2

20 जून

मुंबई महानगरपालिकेच्या मेडिकल एज्युकेशन आणि हॉस्पिटल्सचे संचालक डॉ. संजय ओक यांनी एमआरए मशीन खरेदीच्या टेंडरमुळे राजीनामा दिला आहे. डॉ. ओक यांनी आपला राजीनामा आयुक्तांकडे देऊ केला. पण डॉ. ओक यांना केईएमने पाठिंबा दिलाय. आज केईएममध्ये स्टाफनं केलेल्या आंदोलनाच्यावेळी डॉ. ओक यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

बीएमसीच्या गोवंडी आणि शताब्दी हॉस्पिटलसाठी दोन एमआरआय मशीन खरेदी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे. त्यासाठी जागतिक टेंडर मागवण्यात आली होती. चौकशी नंतर टेंडरमधून फिलिप्स कंपनीची प्रत्येकी आठ कोटी रुपयांची दोन मशीन घेण्याचा निर्णय मंजूर झाला. पण, सपाचे नगरसेवक रईस शेख यांनी याप्रकरणात आरोप केला. हे मशीन प्रत्यक्षात चार कोटी रुपयांना मिळत असून या टेंडरिंगमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला. आणि स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यंानी या प्रकरणाची चौकशी करण्याचं पत्र पालिकेच्या आयुक्तांना दिलं. आयुक्तांनी कंपनीच्या सीईओ ना किंमतीबद्दलचं स्पष्टीकरण मागवलं. अखेर आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हीच MRI मशिन्स खरेदी करण्याचा निर्णय झाला. मात्र, या सर्व आरोपांचे टार्गेट ठरले केईएम हॉस्पिटलचे डीन डॉ. संजय ओक. त्यामुळे डॉ. ओक यांनी आपला राजीनामा आयुक्तांकडे देऊ केला. पण डॉ. ओक यांना केईएमने पाठिंबा दिलाय. आज केईएममध्ये स्टाफनं केलेल्या आंदोलनाच्यावेळी डॉ. ओक यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

close