लेखक भा.द.खेर यांचे निधन

June 21, 2012 9:06 AM0 commentsViews: 5

21 जून

प्रसिद्ध लेखक भा.द. खेर यांचं वृध्दापकाळानं निधन झालंय. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. खेर यांनी आजपर्यंत जवळपास 100 लहान मोठी पुस्तकं प्रकाशित झाली. चरित्रात्मक कादंबरी हा वाड्मयप्रकार मराठीत पहिल्यांदा आणण्याचा मान त्यानाच जातो. सावरकरांच्या जीवनावरील यज्ञ, लालबहादूर शास्त्री, डॉ आंबेडकरांच्या जीवनावरील प्रबुद्ध, चार्ली चॅप्लिनच्या जीवनावरील त्यांच्या कादंबर्‍या विशेष गाजल्या. जपानमधील अणुसंहारावरील हिरोशिमा ही कादंबरीही खूप गाजली. त्याचबरोबर हसरे दुःख, यज्ञ, चारित्र्य दर्शन, हिरोशिमा, क्रांतीच्या वाटेवर, विदूर, गाव तेथे देव, चाणक्य, गंधर्वगाथा आदी पुस्तकंही त्यांच्या नावावर आहे.

close