भाजपचा संगमांना पाठिंबा

June 21, 2012 11:04 AM0 commentsViews: 3

21 जून

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून एनडीएत फूट पडली आहे. एनडीएनं आज राष्ट्रपतीपदासाठी पी.ए.संगमा यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पण संगमांना पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून एनडीएतील सर्व घटक पक्षांचं एकमत करण्यात भाजपला अपयश आलंय. शिवसेना आणि संयुक्त जनता दलानं वेगळी भूमिका घेतली आहे. एनडीएतील या फुटीचं शल्य भाजपला आहे. तशी कबुलीच आजच्या पत्रकार परिषदेत भाजपचे नेते अरुण जेठली यांनी दिली.

काल बुधवारी पि.ए. संगमा यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. आपण राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणारच या निर्णयावर आपण ठाम असल्याचं सांगत संगमांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. संगमाना बीजेडी आणि अण्णा द्रमुकचा पाठिंबा आहे. त्यामुळे भाजप संगमांना पाठिंबा देतील अशी शक्यता होती आणि आज ती खरी ठरली. भाजपनेही संगमांना पाठिंबा जाहीर केलाय. तर दुसरीकडे शिवसेनेपाठोपाठ जेडीयूने काँग्रेसचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एनडीएतील सर्वातमोठ्या पक्षांने असा निर्णय घेतल्यामुळे एनडीएत फूट पडली आहे.

close