नाशिकच्या गंगापूर धरणातून खुलेआम पाणीचोरी

June 21, 2012 11:01 AM0 commentsViews: 11

21 जून

नाशिककरांवर पाणीकपातीचं संकट असताना एक उद्योजक थेट गंगापूर धरणातून पाणीचोरी करत असल्याचं उघड झालं आहे. गंगापूर धरणात सध्या पाण्याची पातळी घसरली. त्यामुळे नाशिकमध्ये पिण्याच्या पाण्यात कपात करण्यात आली. मात्र, याच गंगापूर धरणातून 'सुला वाईन्स' या मद्य उत्पादक कंपनीने थेट पाईपलाईन लावून पाण्याचा उपसा सुरू केला आहे. वाईनरीपर्यंत पाणी पोहोचत नाही म्हणून थेट धरणात जनरेटरही उभं करण्यात आलंय. अर्थात वीनयार्ड म्हणजे शेतीच्या नावाखाली हे पाणी उचलण्यात येत असलं तरी कपातीच्या काळात ते नियमाविरुद्ध आहे.

close