दोन मित्रांच्या मृत्यूमुळे बारामतीवर शोककळा

June 22, 2012 1:53 PM0 commentsViews: 2

22 जून

काल मंत्रालयात लागलेल्या भीषण आगीत 5 जणांचे जीव गेलेत. त्यांच्या जाण्यानं बारामती आणि अकोल्यातलं वातावरण शोकाकुल झालंय. बारामतीतल्या गुगळे कुटुंबावर दुःखाची कुर्‍हाड कोसळलीय. या घरातला कर्ता पुरुष.. महेश गुगळे यांना आपल्या मुलाला मुंबईच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन द्यायाचे होते यासाठी ते मंत्रालयात गेले होते. पण मंत्रालयात लागलेल्या भंयकर आगीत त्यांचा होरपळून मृत्यू झाला. त्याआधी त्यांनी घरी फोन करून मदतीची हाक दिली होती. हीच शेवटची विनवणी आणि आवाज घरच्यांच्या कानी पडला. आगीत गुदमुरुन त्यांचा मृत्यू झाला. महेश गुगळे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी बारामतीत अंत्यसंस्कार करण्यात आलेत.

गुगळे बारामती मर्चंट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. त्यांच्यासोबत त्यांचे जीवलग मित्र बारामती बँकेचे माजी अध्यक्ष होते उमेश पोतेकर हेही मृत्यूमुखी पडले. या दोघांच्या जाण्यानं बारामतीवर शोककळा पसरली. याशिवाय या आगीत.. शिवाजी कोरडे हे राष्ट्रवादीचे अकोल्यातले कार्यकर्ते मृत्यूमुखी पडले. मोहन मोरे आणि वसंत मोरे हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिपायांचेही आगीत जीव गेले.

close