मंत्रालयाचा सांगाडा, सरकारच जबाबदार !

June 22, 2012 4:34 PM0 commentsViews: 8

22 जून

राज्याच्या कारभाराचा गाडा हाकणार्‍या इमारतीचा आता फक्त सांगाडा उरला आहे. तीन मजले कोळसा झाले असून यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पण या इमारतीला इतकी भीषण आग कसं काय लागली यावर अजूनही कोणाचा विश्वास बसत नाहीये. आयबीएन लोकमतच्या हाती अग्निशमन दलाचा प्राथमिक अहवाल हाती लागला आहे. यामध्ये पाणी वरपर्यंत चढवणारी 'वेट रायजर यंत्रणा' बंद होती. धूर आल्यावर अलार्म वाजवणार्‍या 'फायर डिटेक्शन सिस्टिम'चा आवाज कमी करण्यात आला होता. त्याचबरोबर आग लागल्यावर पाणी शिंपडणारी 'स्प्रिकलर्स यंत्रणा'च मंत्रालयात नाहीच. विशेष आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे मंत्रालयात एकही फायर इंजिन उपलब्ध नाही आणि नियम धाब्यावर बसवत पाचव्या मजल्यावरही गॅस सिलिंडरचा सर्रास वापर होतोय. त्यात भरात भर म्हणजे 1955 साली बांधण्यात आलेल्या या वास्तूचे 2008 पासून फायर ऑडिट झालेलंच नाही. त्यामुळे आग लागली आहे की लावण्यात आली हा प्रश्न कायम आहे ?

मंत्रालय इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटला आणि आगीच्या क्राईम ब्रँचकडून चौकशीला सुरुवात झाली आहेत. त्यासाठी चार पथकांची स्थापना करण्यात आलीय. प्रत्येक पथकात 8 ते 10 अधिकारी आहेत. एकूण 40 जणांचा त्यात समावेश आहे. फॉरेन्सिक , फायर ब्रिगेड, इंजिनिअरींग विभाग आणि व्हिडिओ या मुद्यांच्या आधारे चौकशी होणार आहे. तर उद्यापासून मंत्रालयाचं कामकाज विधिमंडळातून सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. सर्व अधिकार्‍यांच्या सुट्‌ट्या रद्द करण्यात आल्यात. मंत्रालयातले सुरक्षेचे नियम डावलण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय. आगीत जळालेल्या काही फाईल्सचं स्कॅनिंग केल्यानं डेटा सुरक्षित असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, आगीमागे कट असल्याचा संशय करत विरोधकांनी चौकशीची मागणी केली आहे. कालच्या आगीच्या पार्श्वभूमीवर आज विधानसभेत सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. त्यात विरोधकांनी मुंबईतल्या महत्त्वाच्या आणि प्रशासकीय इमारतींच्या सुरक्षेबाबत चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. अग्निशमन दलाचा प्राथमिक अहवाल

- पाणी वरपर्यंत चढवणारी 'वेट रायजर यंत्रणा' बंद – धूर आल्यावर अलार्म वाजवणार्‍या 'फायर डिटेक्शन सिस्टिम'चा आवाज कमी- आग लागल्यावर पाणी शिंपडणारी 'स्प्रिकलर्स यंत्रणा'च मंत्रालयात नाही – 'फायर एक्सटिंग्विशर यंत्रणा' उपलब्ध, पण तिचा वापर झाला नाही- मंत्रालयात एकही फायर इंजिन उपलब्ध नाही- नियम धाब्यावर बसवत पाचव्या मजल्यावरही गॅस सिलिंडरचा वापर- आग लागल्यानंतर अर्ध्या तासानंतर ब्रिगेडला वर्दी- फायर ब्रिगेड अधिकार्‍यांना मार्ग दाखवण्यासाठी मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते- मंत्रालयात 2008नंतर फायर ऑडिट नाही

संबंधित बातम्या

मंत्रालयाची नवी इमारत बांधावी – पवार

मंत्र्यांच्या केबिनचा उरला सांगाडा दोन मित्रांच्या मृत्यूमुळे बारामतीवर शोककळा मंत्रालयाच्या आगीची न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी-गडकरी जीवाची बाजी लावून राखली राष्ट्रध्वजाची शान सीएमसाहेबांचं चेंबर कसं काय वाचलं ?- अजित पवार मंत्रालय काल आणि आज सर्व फाईल सुरक्षित, मंत्रालयाचे कामकाज विधानभवनातून -CM सव्वा दोन लाख फाईलींची माहिती सुरक्षित – मुख्यमंत्री मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतच अक्षम्य चुका मंत्रालयाच्या आगीत तिघांचा मृत्यू आगीची क्राईम ब्रँच चौकशी होणार – मुख्यमंत्री 'आदर्श'ची कागदपत्र सुरक्षित ?

close