राजा परवेझ अशरफ पाकचे नवे पंतप्रधान

June 22, 2012 5:18 PM0 commentsViews: 4

22 जून

अखेर पाकिस्तानला नवे पंतप्रधान मिळाले आहे. राजा परवेझ अशरफ यांची नवे पंतप्रधान म्हणून नॅशनल असेंब्लीनं औपचारिक निवड केलीय. 300 पैकी 200 मतं त्यांना मिळाली. मंगळवारी युसूफ रझा गिलानी यांना सुप्रीम कोर्टाने पंतप्रधानपदी अपात्र ठरवलं होतं. त्यांनंतर आज हा निर्णय घेण्यात आला. 26 एप्रिल 2012 रोजी पहिल्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्याविरोधात वादळ उठलं. जेव्हा गिलानी यांना पाक सुप्रीम कोर्टाने दोषी ठरवलं. पदावर असताना दोषी ठरवले जाणारे तसेच पदावरून अपात्र ठरणारे गिलानी हे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान..राष्ट्राध्यक्ष झरदारी यांच्याविरोधातली भ्रष्टाचाराची प्रकरणं पुन्हा सुरू करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. पण ते आदेश न पाळल्यानं कोर्टाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत सुप्रीम कोर्टानं गिलानींवर कारवाईचा बडगा उगारला.

close