अर्भक पुरताना रंगेहाथ पकडले

June 23, 2012 10:06 AM0 commentsViews: 7

23 जून

सोलापुरात अजित उपासे यांच्या हॉस्पिटलमध्ये स्त्री भ्रूण हत्या होत असल्याच उघडकीस आल आहे. हॉस्पिटलची आया ललिता कंाबळे हिला स्मशानात अर्भक पुरताना रंगेहाथ पकडण्यात आलंय. नगरसेविका सुवर्णा हिरेमठ रुपाभवानी मंदिरात गेल्या असताना त्यांना आया ललिता कांबळे एक पिशवी घेऊन शोधा-शोध करत असताना नजरेस पडल्यात. हिरमेठ यांनी विचारपुस केली असता धक्कादायक प्रकारसमोर आला. स्मशानात मृत अर्भक पुरण्यासाठीच आल्याच ललिता कांबळे यांनी कबुलीही दिली. हे अर्भक उपासे हॉस्पिटलमधील डॉ. संगिता गुरव यांनी विल्हेवाट लावण्यासाठी दिलं असल्याचही ललिता कांबळे यांनी सांगितलं. याप्रकरणी उपासे हॉस्पिटलच्या डॉ.संगीता गुरव आणि आया ललिता कांबळे यांना 25 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

close