माहीला वाचवण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न

June 23, 2012 12:02 PM0 commentsViews: 1

23 जून

हरियाणातल्या मानेसरमध्ये 5 वर्षांची मुलगी माही बोअरवेलमध्ये अडकलीय. तिला वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. गेल्या तीन दिवसांपासून माही बोअरवेलमध्ये अडकली आहे. लष्कराच्या इंजिनिअर्सच्या नेतृत्वाखालची टीम माहीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतेय. त्यासाठी भुयार खोदण्याचं काम सुरू आहे. पण कमालीचं तापमान आणि धूळ यामुळे बचावकार्यात अडचणी येतायत. माहीला बाहेरून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतोय. पण, गेल्या 24 तासांपासून काहीच हालचाल दिसून आली नसल्यानं माहीच्या प्रकृतीबाबत चिंता निर्माण झालीय. बचावकार्याच्या ठिकाणी मेडिकल टीमसुद्धा हजर आहे. गेल्या बुधवारी रात्री 11 वाजता माही घराजवळच्या उघड्या बोअरवेलमध्ये पडली होती.

close