राजेश खन्ना हॉस्पिटलमध्ये दाखल

June 23, 2012 12:41 PM0 commentsViews: 6

23 जून

ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांना पुन्हा एकदा लिलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलंय गेल्या अनेक दिवसांपासून 'काकां'ची त्यांची प्रकृती बिघडलीय. गेल्या तीन दिवसांपासून राजेश खन्नांनी जेवण बंद केल्याचं समजतंय. पण त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती ट्विंकल खन्ना हिनं दिली. दोन दिवसांपुर्वीच राजेश खन्ना यांनी आपल्या घराच्या बाल्कणीत येऊन माझी तब्येत ठिक असल्याचं सांगत हात उंचावून सगळ्यांना अभिवादन केले होते. यावेळी राजेश खन्ना यांचे जावई अभिनेता अक्षयकुमारने काकांची तब्येत ठिक आहे चिंता करण्यासारख काही नाही असं सांगितलंय. काकांच्या चाहत्ये मात्र चिंतातुर झाले सगळ्यांची एकच प्रार्थना आहे की, बॉलिवूडच्या खरा स्टारनं आजारावर मात करुन आपल्यात परत यावं.

close