स्त्री भ्रूण हत्ये प्रकरणी डॉ.उपासे दाम्पत्य फरार

June 23, 2012 1:52 PM0 commentsViews: 3

23 जून

सोलापूरमध्ये अजित उपासे याच्या हॉस्पिटलमध्ये स्त्री भ्रूण हत्या होत असल्याची घटना उघड झाली आहे. गुन्हा दाखल झाल्याचं कळताच डॉक्टर दाम्पत्य अजित उपासे आणि त्यांची पत्नी प्रियदर्शनी उपासे फरार झाले आहे. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. हॉस्पिटलमधली आया ललिता कंाबळेला स्मशानात अर्भक पुरताना पकडण्यात आलं. नगरसेविका सुवर्णा हिरेमठ यांनी कांबळेला पाहिलं. संशय आल्यानं विचारपूस केल्यावर स्मशानात मृत अर्भक पुरण्यासाठीच आल्याचं ललिता कांबळेनं कबूल केलं.याप्रकरणी उपासे हॉस्पिटलच्या डॉ. संगीता गुरव आणि आया ललिता कांबळे यांना 25 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

close