फिल्मसिटीत मराठी मालिकांचा ‘उंच झोका’

June 23, 2012 3:02 PM0 commentsViews: 3

23 जून

मराठी मालिकांच्या निर्मात्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. मंुबईतील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये आता वर्षभरासाठी मराठी मालिकांना पन्नास टक्के सवलत मिळणार आहे. गोरेगाव फिल्मसिटीमध्ये मराठी मालिकांना सरकारने देण्यात येणारी 50 टक्के सवलत रद्द केली होती. याप्रकरणी निर्मात्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आयबीएन लोकमतने या बातमीचा पाठपुरावा केला. तसेच शिवसेना आणि मनसेनं सरकारच्या निर्णायाचा निषेध करत फिल्मसिटी बंद पाडण्याचा इशारा दिला होता. अखेर सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांनी मराठी निर्माते, चित्रपट महामंडळ, भारतीय चित्रपट सेना, मनसे चित्रपट सेना आणि अभिनेते विक्रम गोखले यांच्यासोबत बैठकही घेतली होती. 15 दिवसांत याबद्दल निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं होतं.

close