आदर्श प्रकरणी विलासराव देशमुख आयोगासमोर हजर

June 26, 2012 9:39 AM0 commentsViews: 5

26 जून

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी आज माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांची साक्ष सुरू आहे. थोड्याच वेळापूर्वी ते न्यायालयीन आयोगापुढे हजर झाले आहेत. काल माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांची न्यायालयीन आयोगासमोर साक्ष झाली. यावेळी सुशील कुमारांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे बोट दाखवलं. आपण फक्त अधिकार्‍यांकडून आलेल्या नोटींग्ज मंजूर केल्या. आदर्शला जमीन देण्याबाबतचा निर्णय मी सूत्रं घेण्यापूर्वीचं झालेला होता, असं सुशीलकुमार शिंदे यांनी आयोगाला सांगितलं. प्रत्येक फाईल तपासणं मुख्यमंत्र्यांसाठी शक्य नसतं असंही शिंदे म्हणाले. त्यामुळे आज विलासराव देशमुख आपल्या साक्षीमध्ये काय माहिती देतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

close