डॉ.कोल्हे यांचं हॉस्पिटल सील

June 26, 2012 10:11 AM0 commentsViews: 2

26 जून

स्त्री भ्रूण हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या डॉ.राहुल कोल्हे यांचं जळगावला असलेलं पदमावती हॉस्पिटल सील करण्यात आलंय. परळीचे डॉ. सुदाम मुंडे यांच्याशी संबंध असल्याच्या आरोपावरुन डॉ.कोल्हे हे परळी पोलिसांच्या ताब्यात आहे. सील असलेल्या सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून डॉ.कोल्हे हे सोनोग्राफी करीत असल्याचं तपासात उघड झालं आहे. जवळपास 55 केस मध्ये डॉ. कोल्हे आणि डॉ.मुंडे यांनी एकत्रित केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. उपविभागीय अधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानं महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी निर्मला शर्मा यांच्या पथकानं ही कारवाई केली.

close