डॉ. मुंडेसह 13 डॉक्टरांचे परवाने पाच वर्षांसाठी रद्द

June 25, 2012 3:52 PM0 commentsViews: 17

25 जून

स्त्रीभ्रूण हत्या आणि अवैध सोनोग्राफी प्रकरणी राज्यातल्या 13 डॉक्टरांची लायसन्स पाचवर्षांसाठी रद्द करण्यात आली आहेत. महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलन हा निर्णय घेतला असून यात डॉ.सुदाम मुंडे आणि डॉ. सरस्वती मुंडे यांचाही समावेश आहे. मागिल महिन्यात बीडमध्ये गर्भपात करताना एक महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर बीड,सोलापूर, कोल्हापूर,उस्मानाबाद,परभणी, जळगाव, मुंबई, आदी शहरात स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार उघडकीस आले होते. खडबडून जागे झालेल्या महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलन धडक कारवाईला सुरुवात केली. राज्यभरातील 41 डॉक्टर आणि हॉस्पिटलची ब्लॅक लिस्ट तयार करण्यात आली. याकारवाईत 5 डॉक्टरांचे परवाने रद्द करण्यात आले. स्त्री अर्भकाच्या हत्येप्रकरणी डॉक्टरांचे लायसन्स कायमचे रद्द करावे अशी मागणी जोर धरू लागल्यामुळे अखेर आज 13 डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली. यांचे परवाने 5 वर्षांसाठी रद्द

परळी डॉ. सुदाम मुंडे डॉ. सरस्वती मुंडे

उस्मानाबादडॉ.अरूणा गावडेडॉ.चंद्रकांत बोडकेडॉ. प्रवीण सिद्दीकीडॉ. व्ही. कस्तुरकर

कोल्हापूरडॉ. शिवाजी माने, कोल्हापूर डॉ. गजानन कोळी, कोल्हापूर

सोलापूरडॉ. विलास पाटीलडॉ. प्रदीपचंद गांधीडॉ. तेजस प्रदीपचंद गांधी

डॉ. शिवराम एकलारे, नांदेडडॉ. मोहन नागने, पुणे

close