स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

June 26, 2012 10:15 AM0 commentsViews: 3

26 जून

स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी परळीमधील डॉ. सुदाम आणि सरस्वती मुंडे प्रकरणात आता सरकारनं वकिलांची नेमणूक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्त्रीभ्रूण हत्या आणि अवैधपणे गर्भपात केल्याचा आरोप डॉ. सुदाम मुंडे याच्यावर आहे. या प्रकरणात सरकारची बाजू उज्ज्वल निकम मांडणार आहेत. मागिल रविवारी फरार झालं मुंडे दाम्पत्य पोलिसांना शरण आलंय. न्यायालयामोर हजर केले असता त्यांना 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

close