प्रणव मुखर्जी उद्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देणार

June 25, 2012 7:43 AM0 commentsViews: 2

25 जून

काँग्रेसच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक आज पार पडली. अर्थमंत्री आणि राष्ट्रपतीपदाचे प्रबळ दावेदार प्रणव मुखर्जी यांना या बैठकीत काँग्रेसपक्षातर्फे निरोप देण्यात आला. प्रणव मुखर्जी यांची ही शेवटची कार्यकारणी बैठक होती. उद्या प्रणव मुखर्जी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. 1984 ते 89 या 5 वर्षांचा अपवाद वगळता 1978 पासून मुखर्जी हे सलग काँग्रेसच्या कार्यकारणीचे सदस्य आहेत. दरम्यान, रुपयांची घसरण थांबवण्यासाठी आणि अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रणव मुखर्जी आज काय घोषणा क रणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

close