अंधेरीत ‘हैदराबादी’ फूड फेस्टिवल

November 26, 2008 4:45 AM0 commentsViews: 5

26 नोव्हेंबर, मुंबईशची मराठेभारतात पंचपक्वानांपासून ते पाणीपुरीपर्यंत सगळ्याच पदार्थांमध्ये दर प्रांतागणिक विविधता आढळते.असाच अनेक चवींचा हैद्राबादी फूड फेस्टीव्हल मुंबईत अंधेरीतल्या 'हॉटेल व्हीट' मध्ये भरला आहे. हा फेस्टिवल 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू रहाणार आहे.अस्सल हैदराबादी चवीचे पदार्थ या फूड फेस्टिवलमध्ये खायला मिळत आहेत आणि अर्थातच त्यामुळे इकडे येणारे खवय्ये अगदी खुश आहेत. पनीर लसनी, तंदुरी कबाब आणि चिकन जाफरानी पुलाव अशा अनेक पदार्थांवर आडवा हात मारल्यावरही "पोट तर भरलं, पण मन नाही भरलं" अशी प्रतिक्रिया इकडे येणारे खवय्ये देत आहेत.अर्थातच खवय्यांनी तोंड भरून कौतुक केल्यानं इथले शेफही खुश आहेत. "हैदराबादी पदार्थ ओळखले जातात ते त्यातल्या चवदार मसाल्यांसाठी. आम्ही हैदराबादी पदार्थांची ओरिजनल टेस्ट मेन्टेन करायचा पुरेपूर प्रयत्न केलाय" असं दीपक अधिकारी यांनी सांगितलं.टेस्ट बरोबर हेल्थचाही इंतजाम इथं आहे. "हे पदार्थ बनवताना आम्ही लो कॅलरी बटर वापरलं आहे. चवीबरोबरच तब्येतीचीही इथं काळजी घेतली जाते" असं दीपक अधिकारी यांनी सांगितलं.आणि हे सगळं कमी की काय म्हणून पोट तृप्त झाल्यावर दिल खुश करण्याकरता उत्तम गाण्यांचाही जामानिमा इथं आहे. मग विचार काय करताय ? एक सुंदर संध्याकाळ साजरी करायची असेल, तर या फेस्टिवलला भेट द्यायला नक्कीच हरकत नाही.

close