इंग्लंडचा धुव्वा, इटली सेमीफायनलमध्ये

June 25, 2012 9:50 AM0 commentsViews: 1

25 जून

इंग्लंडचा पराभव करत इटलीने युरो कपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. क्वार्टरफानलमध्ये इटलीनं इंग्लंडचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 नं रोमांचकारी पराभव केला. या मॅचमध्ये सुरुवातीपासूनचं वर्चस्वाची लढाई रंगली. दोन्ही टीमनं सुरुवातीपासूनचं आक्रमक खेळ केला. इटलीनं उत्तम खेळाचा नमुना पेश करत मिडफिल्डवर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. पण इंग्लंडनंही भक्कम डिफेन्स उभारला. अखेर वेळ संपली तेव्हा मॅच 0-0 अशी बरोबरीत होती. आणि स्पर्धेचं पहिलं पेनल्टी शेटआऊट पार पडलं. पेनल्टीमध्ये इटलीनं इंग्लंडचा 4-2 नं पराभव केला.

close