रिझर्व्ह बँकेचा फुसका बार

June 25, 2012 10:45 AM0 commentsViews: 3

25 जून

भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी बाँडमध्ये परदेशी गुंतवणुकीची मर्यादा रिझर्व्ह बँकेनं वाढवली आहेत. त्यामुळे परदेशी संस्था आता या बाँडमध्ये अधिक गुंतवणूक करु शकतात. 15 अब्ज डॉलर्सवरुन ही मर्यादा 20 अब्ज डॉलर करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेमुळे सेन्सेक्स बाजारावर परिणाम झाला. सेन्सेक्समध्ये 90 अंशांची घसरण, निफ्टी 31 अंशांनी घसरला आहे.

रुपयाची होत चाललेली घसरण रोखण्यासाठी सरकारने अखेर हालचाल सुरु केली आहे. आजच्या घोषणेमुळे पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये पहिले 10 अब्ज डॉलर्सवर 3 वर्ष लॉक-इन सवलत लागू होणार आहे. आणि उरलेल्या 10 अब्ज डॉलरसाठी लॉक-इन सवलत लागू नसणार आहे. इंफ्रा बाँडमध्ये गुतवणूकीसाठी 15 महिने आणि इंफ्रा डेट फंडमध्ये 1 वर्ष कमी करण्यात आलेत. यामुळे विमा कंपन्यांना यात सूट देण्यात आली आहे. सरकारी बाँडमध्ये एफआईआई गुतवणुकीला 3 वर्षाची मर्यादा केलीय. रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेमुळे रुपयाच्या घसरण सुरुच आहे डॉलरच्या तुलनेत 56 रुपये 85 पैसे रुपया घसरला आहे. तज्ञांचं म्हणणं आहे की, रुपयाची होत चाललेली घसरण रोखण्यासाठी सरकारने हे पाऊलं उचलं आहे पण यामुळे फारसा काही परिणाम होणार नाही. जोपर्यंत परदेशी गुंतवणुकीला वाव दिली जात नाही तोपर्यंत परिस्थिती अशीच असेल.

close