स्त्री भ्रूण हत्येची घटना राजकीय दबावामुळे चूप?

June 25, 2012 12:16 PM0 commentsViews: 2

25 जून

संगमनेरमध्ये स्त्री भ्रूण हत्येची घटना राजकीय दबावामुळे दाबण्यात येत असल्याचा आरोप होतोय. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या घराजवळच डॉ.अमित शिंदेंच्या हॉस्पिटलमध्ये योगिता दवंगे या महिलेचा 12 आठवड्यांनंतर गर्भपात करण्यात आला. मुलीचा गर्भ असल्यानं हा गर्भपात झाल्याची तक्रार वैद्यकीय अधिकार्‍यांनी संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलीय. त्यावेळी आपल्या पोटात दुखत असल्यानं गर्भपात केल्याचं योगिताचं म्हणणं आहे. मात्र, याबद्दलचे कोणतेही केसपेपर डॉ. शिंदेंच्या हॉस्पिटलमध्ये नाहीत, तशी तक्रार वैद्यकीय अधिकार्‍यांनीही केलीय. डॉक्टर शिंदे फरार आहेत मात्र, त्यांना असलेल्या राजकीय वरदहस्तामुळे हे प्रकरण दाबलं जात असल्याचा आरोप होतोय.

close