तटकरेंच्या घोटाळ्याचे कनेक्शन मंत्रालयापर्यंत – सोमय्या

June 26, 2012 1:40 PM0 commentsViews: 2

26 जून

जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या घोटाळ्याचे कनेक्शन्स मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत आहेत असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. सोमय्या यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे बोट दाखवलंय. तटकरेंनी 10 लोकांच्या नावाने 100 कंपन्या स्थापन केल्यात आणि त्या सर्व कंपन्यांची मालकी तटकरे कुटुंबीयांचीच असल्याचं त्यांनी म्हटलंय. तटकरेंनी एका कंपनीत फक्त 50 हजार रुपये गुंतवले आणि त्यांना 33 टक्के भागिदारी मिळाली आहे. तटकरेंच्या आरोपांची एसआयटीकडून चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केलीय. लवकरच तटकरेंचा आणखी एक घोटाळा उघड करणार असल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं.

close