प्रणवदांनंतर अर्थमंत्रालय पंतप्रधानांकडे ?

June 25, 2012 12:42 PM0 commentsViews: 1

25 जून

काँग्रेसने अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषित केल्यानंतर प्रणव मुखर्जी यांच्यानंतर अर्थमंत्री कोण असणार अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र अर्थमंत्रालय पंतप्रधान मनमोहन सिंग स्वत:कडे ठेवणार असल्याची माहिती सुत्रानी दिली. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मनमोहन सिंग हीच उत्तम व्यक्ती असल्याचं सोनिया गांधींनी स्पष्ट केलंय त्यामुळे दुसर्‍या कोणाकडे अर्थखातं द्यायला सोनियांनी नकार दिलाय. सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता मनमोहन सिंगच योग्य पर्याय आहे. अर्थमंत्रालय हाती आल्यानंतर अर्थखात्यासाठी मनमोहन सिंग यांना मदत करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांची टीम नेमण्याचीही शक्यता आहे.

close