पुण्यामध्ये लग्नाच्या वरातींवर बंदी ?

June 26, 2012 3:13 PM0 commentsViews: 50

26 जून

कानठळ्या बसवणारा डिजे, बँन्ड बाजाच्या तालावर बेभान होऊन नाचणारे वर्‍हाडी, आणि 'मेरे यार की शादी है' असं सांगत अडवलेली वाहतूक असं चित्र हमखास लग्नाच्या वरातीचं असतं जर असं काही नसेल तर ती वरात कसली…पण आता पुण्यात अशा वराती आता दुर्मिळ होणार आहे. कारण, वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणार्‍या लग्नाच्या वरातींवर बंदी येण्याची शक्यता आहेत. पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव आणून अशी बंदी घालण्याचे संकेत दिले. तसेच नवरात्र काळात गँगवॉरचं कारण ठरणार्‍या तोरण मिरवणुकांवरही बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचं अजित पवार यांनी घोषित केलं. तसंच अनधिकृत फ्लेक्सवरही कायद्याचा बडगा उगारण्यात आलाय. यापुढे बेकायदेशीरपणे फ्लेक्स लावणार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे असे आदेश अजित पवारांनी दिले आहे. सर्वच राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते वाढदिवस अथवा इतर निमित्त काढून ओंगळवाणे फ्लेक्स, बॅनर्स, होर्डिंग लावत असल्यानं शहर विद्रूप होतंय असं सांगत अजितदादांनी हा निर्णय घेतला.

close