फसवणूक करण्यार्‍या बिल्डराची 17 एकर जागा जप्त

June 26, 2012 4:09 PM0 commentsViews: 2

26 जून

विरारमध्ये बिल्डरकडून फसवणूक झालेल्या जवळपास 800 ग्राहकांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. बिल्डरच्या जमिनीच्या लिलावाला हायकोर्टाने परवानगी दिली आहे. विरारमध्ये बिल्डर जयंत परांजपे यांनी घरं बाधण्यासाठी लोकांकडून पैसे घेतले होते. जे. पी. नगर योजनेच्या माध्यमातून जयंत परांजपेंनी स्वस्त दरात घरकुल योजना तयार केली होती. पण 20 वर्षं उलटून गेली तरी घरं बांधून दिली नव्हती. त्यामुळे जवळपास 800 ग्राहकांनी घेतली ग्राहक पंचायतीत धाव घेतली होती. हायकोर्टाने त्याची दखल घेऊन बिल्डरची जवळपास 17 एकर जागा जप्त करायला लावली. जागेच्या लिलावातून मिळणारे पैसे ग्राहकांना वाटण्यात येणार आहेत. उद्या सकाळी जागेचा लिलाव होणार आहे. लिलावासाठी 24 कोटी 48 लाख इतकी किमान बोली ठरवण्यात आली आहे.

close