पाकच्या तुरुंगातून सरबजीत सिंग सुटणार ?

June 26, 2012 5:16 PM0 commentsViews: 64

26 जून

पाकिस्तानातल्या जेलमध्ये गेल्या 22 वर्षांपासून असलेले सरबजित सिंग यांच्या सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी सरबजित सिंग यांची दयेची याचिका मंजूर केली आहे. आणि त्यांच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर केलंय. अनेक भारतीयांनी सरबजीत यांची सुटका व्हावी असं आवाहन केलं होतं. यासाठी सहीनिशी पत्रही पाठवली होती. दोन्ही देशांमध्ये एखाद्या आरोपीची फाशीची शिक्षा माफ करण्याची तरतूद आहे. सरबजीत यांच्या वकिलांनी याचीच आठवण करुन दिली होती. त्यामुळे सरबजीत यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता सरबजीत यांची कधी सुटका होणार आणि ते घरी कधी येणार याची आस त्यांच्या कुटुंबीयांना आहे.

close