जळगावमध्ये सहा महिन्याच्या चिमुरडीचा जळून मृत्यू

June 27, 2012 2:42 PM0 commentsViews: 1

27 जून

जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यात अवघ्या 6 महिन्याच्या चिमुरडीचा जळुन मृत्यू झाला. दर्शना गोपाळ चौधरी असं या मुलीचं नाव आहे. आईनंच आपल्या मुलीचा बळी घेतल्याचा पोलिसांचा संशय आहे. रावेर तालुक्यातील तांदलवाडी गावातील राहत्या घरी ही मुलगी जळाली होती. दर्शनाला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून जरी नोंद केली असली तरी आई घरात असताना या चिमुरडीचा झालेला मृत्यू हा संशयास्पद असल्याचं बोललं जातंय. दुदैर्वाची गोष्ट म्हणजे या मुलीला जन्मापासून एका डोळ्यानं दिसत होतं. तिच्या उपचारासाठी या कुटुंबाचे 35 हजार रुपये खर्च झाले होते. घरची परीस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने उपचारासाठी पैसे नसल्याने या मुलीचे हाल होत होते. निंभोरा पोलीस स्टेशनला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

close