पावसानं दडी मारल्यानं पाणीकपातीचं संकट

June 27, 2012 3:00 PM0 commentsViews: 1

27 जून

पावसानं दडी मारल्यानं राज्यात पाण्याची तीव्रटंचाई निर्माण होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे पाण्याचं तातडीनं नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि नगरपरिषदांच्या मुख्याधिकार्‍यांना सरकारनं दिले आहेत. ज्या जलाशयांतून पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त शेती, आणि औद्योगिक योजनांसाठी पाणी पुरवले जाते तिथलं पाणी फक्त पिण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेशही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. तसेच येत्या काही दिवसांत पाऊस आला नाही तर बांधकाम व्यावसायिक, हॉटेल्स आणि स्विमिंग पूलच्या पाणीपुरवठ्याबद्दलही निर्णय घ्यावा लागेल अशी माहिती पाणी पुरवठामंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी दिली.

close