महार वतन जमिनीचा वाद खोटा – अजित पवार

June 27, 2012 4:11 PM0 commentsViews: 145

27 जून

पुण्याजवळील मुळशी तालुक्यातील रिहे गावातील महार वतन जमीन प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय. 2004 साली अजित पवार जलसंपदा मंत्री असताना पाटबंधारे खात्याच्या मालकीच्या जमिनीची विक्री करून या जमिनीवर अजित पवारांच्या वहिनी शर्मिला पवार यांचा आलिशान बंगला उभा राहीलाय असा सनसनाटी गौप्यस्फोट केलाय रवी बर्‍हाटे यांनी. त्यांनी पत्रकार परिषदेत माहितीच्या अधिकारात मिळालेली कागदपत्रं सादर करून हा आरोप केला. मुळशीच्या तत्कालीन तहसीलदारांनी दिलेली विक्रीची ऑर्डर तसेच 2008 साली तत्कालीन कलेक्टर यांनी या विक्रीला मान्यता दिल्याचं त्यांनी सांगितलंय. या प्रकरणीवर पुणे दौर्‍यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारलं असता अजितदादांनी पाटबंधारे विभागाची कसलीही जमीन पवार कुटुंबियांना विकलेली नाही. हे सगळं थोतांड आहे असं उत्तर दिलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वहिनी शर्मिला श्रीनिवास पवार यांनी कलेक्टरचे बनावट आदेश वापरून सुमारे 3 एकर जमीन हडपल्याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, अजित पवार यांनी हे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.

close