स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी 4 डॉक्टरांसह 7 जणांना अटक

June 27, 2012 9:36 AM0 commentsViews: 83

27 जून

कोल्हापूरमध्ये गर्भलिंगनिदान व स्त्री-भ्रूण हत्या करणार्‍या रॅकेटमधील 4 डॉक्टरांसह 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील डॉ.महिंद्र कानडे आणि वैशाली कानडे यांच्या कानडे हॉस्पिटलमध्ये सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी तपासणी केल्यानंतर या ठिकाणी गर्भपात केल्याचे पुरावे मिळाले होते. या ठिकाणी गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधं आणि चार महिला आणि रुग्णही आढळले. पण त्याची कुठलीही नोंदणी हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली नाही. या रॅकेटला पकडण्यासाठी एका गर्भवती महिलेच्या मदतीनं एक सापळा रचण्यात आला होता. त्यातच डॉ. संतोष मोरे आणि डॉ. ज्ञानदेव दळवी आणि इतर तीन सहकार्‍यांना पकडण्यात आलंय.

close