आयआयटीच्या प्रवेशपरीक्षेचा वाद अखेर मिटला

June 27, 2012 4:18 PM0 commentsViews: 2

27 जून

आयआयटीच्या प्रवेशपरीक्षेचा वाद अखेर मिटला आहे. मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल आणि आयआयटी यांनी प्रवेश परीक्षेसंदर्भात तडजोड करुन नवा फॉर्म्युला तयार केला आहे. यानुसार बारावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणार्‍या 20 टक्के विद्यार्थ्यांना आयआयटीची प्रवेश परीक्षा देता येईल. तसेच प्रवेश परीक्षा ही दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. बारावीच्या परीक्षेला सर्वाधिक गुण मिळवणार्‍या 20 टक्के मुलांना प्रवेशाची मुख्य परीक्षा देता येईल. या परीक्षेत पास झालेल्या मुलांना नंतर ऍडव्हान्स परीक्षा द्यावी लागणार आहे. एकूण विद्यार्थ्यांपैकी दीड लाख विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतील. त्यातून पास झालेल्या विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळणार आहे. नव्या तडजोडीनुसार निर्माण झालेला फॉर्मुला 2013 पासून अंमलात येईल.

close