शिष्यवृत्तीसाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे आंदोलन

June 27, 2012 9:55 AM0 commentsViews: 4

27 जून

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबतचे घोळ अजूनही सुरू आहेत. शिष्यवृत्तीसाठी पात्र असूनही अनेक कॉलेजेस प्रवेशासाठी अवाजवी फी आकारत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. काही कॉलेजमध्ये गेल्या वर्षीची पूर्ण फी भरेपर्यंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मार्कशीट्स आणि ऍडमीशन्सही अडवून ठेवल्यात. या विरोधात नाशिकच्या महसूल आयुक्तालयासमोर छात्रभारती विद्यार्थी संघटनेनं आंदोलन केलं. बीबीए,बीबीसी, बी.कॉम अभायसक्रमासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नकारून संपूर्ण फी वसुली केली जात आहे. मात्र सरकारने मागसवर्गीय विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय कायम ठेवला असून सुध्दा महाविद्यालयांनी सरकारच्या निर्णयाला केराची टोपली दाखवली आहे.

close