राज यांच्याविरोधात खटला दाखल होणार?

June 27, 2012 4:38 PM0 commentsViews: 5

27 जून

हायकोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होणार आहे. महाराष्ट्राचे ऍडव्होकेट जनरल डी. जे. खंबाटा यांनी यासाठी परवानगी दिली आहे. महापालिका निवडणुकीआधी शिवाजी पार्कवर जाहीर सभा घ्यायला हायकोर्टाने राज ठाकरेंना परवानगी दिली नव्हती. त्यामुळे राज ठाकरेंनी जाहीरपणे कोर्टावर टीका केली होती. त्यानंतर राज यांच्याविरोधात कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची परवानगी समाजवादी पक्षाचे नेते एजाज नकवी यांनी मागितली होती.

03 फेब्रुवारी 2012 ला राज ठाकरे यांनी प्रचार सभासाठी मुंबईतील शिवाजी पार्कवर परवानगी मागितली होती. मात्र कोर्टाने परवानगी नाकारली होती यावेळी राज यांनी हायकोर्टावर टीका केली. लोकशाहीमध्ये निवडणुकाच्या प्रचाराच्या वेळी मैदान दिली पाहिजे. इथे बोलू नका, तिथे परवानगी भेटणार नाही अशी बंधन घालून निवडणुका कशा लढवल्या जाणार ? मग निवडणुका घेताच कशाला ? असा संतप्त सवाल राज यांनी केला. तसेच शिवाजी पार्कचे मैदान हे सभेची परंपरा आहे. तिथे आजवर अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या आहेत. मागील वर्षी शिवसेनेच्या दसरा मेळावा झाला त्यांनीही कायदा मोडला आणि यावर्षीही त्यांना राज्य सरकारच्या म्हणण्यावर पुन्हा परवानगी देण्यात आली.

सरकार म्हणाले तर परवानगी मिळत असेल तर कोर्टाने निकाल कशाला द्यावा ? नागरिकांनी कोर्टाकडे काय म्हणून दाद मागावी. मला कोर्टाचा आदर आहे पण कोर्टाने पक्षपातीपणा करु नये. कोर्टाने कोर्टाची भूमिका पारदर्शक ठेवावी कोणा एकाच्या बाजूने निर्णय देऊ नये असंही राज म्हणाले. त्याचबरोबर कोर्टाने याचिका फेटाळली हा माझा एकट्याचा प्रश्न नाही. यासाठी मी एक नागरिक म्हणून रस्त्यावर उतरणार आणि जिथे मिळेल तिथे सभा घेणार आहे कोणाल किती खटले दाखल करायचे असेल त्यांनी खुशाल दाखल करावे मला त्याची पर्वा नाही असा इशारा राज यांनी दिला होता.

काय म्हणाले होते राज ठाकरे व्हिडिओ

close