नवी मुंबईत 10 हॉस्पिटलचे परवाने रद्द

June 27, 2012 10:00 AM0 commentsViews: 3

27 जून

नवी मुंबईतील 10 हॉस्पिटलचेे परवाने महापालिकेनं रद्द केलेत. यामध्ये हिरानंदानी हॉस्पिटल, गुरुकूल हॉस्पिटल, लाईफ लाईन रुग्णालयाचा समावेश आहे. नवी मुंबई पालिका आरोग्य अधिकार्‍यांनी ही कारवाई केली आहे. बॉम्बे नर्सिंग कायद्‌यातील कलम 5 अन्वये ही कारवाई करण्यात आलीय. या रुग्णालय मध्ये नोंदणी केल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचं प्रमाण पत्र नसून अग्निशमन प्रतिबंधक उपायोजना नाहीत. तसेच या हॉस्पिटलमध्ये अतिरीक्त रुग्ण खाटा आढळून आल्यात. आरोग्य विभागानं नवी मुंबईत 175 नर्सिंग होम आणि रुग्णालयचं सर्वेक्षण केलं. 30 जूनपर्यंत या हॉस्पिटल्सनी संबंधीत प्रमाणपत्र आणि अटींची पुर्तता न केल्यास 1 जुलैला या हॉस्पिटलना टाळं ठोकण्यात येईल असंही अधिकार्‍यांनी म्हटलंय.

close