सानिया भडकली, आपला वापर प्यादं म्हणून केला !

June 27, 2012 10:47 AM0 commentsViews: 4

27 जून

भारतीय टेनिसमधील ऑलिम्पिक प्रवेशावरुन सुरु झालेला वाद हा काही संपता संपत नाहीये. काल मंगळवारी रात्री सानिया मिर्झाला वाईल्ड कार्ड मिळाल्यानंतर या वादात अजून एक ठिणगी पडली. सानिया मिर्झानं भारतीय टेनिस असोसिएशनच्या निर्णयावर त्याचबरोबर पेस आणि भूपती या दोन्ही खेळाडूंवर नाराजी व्यक्त केली आहे. टेनिस असोसिएशननं आपला वापर एक प्यादं म्हणून केला असा आरोप केलाय. तसेच पेस आणि भुपतीच्या वर्तनामुळे आपण दुखावलो गेल्याचंही सानियानं म्हटलंय. लिएंडर पेसनं ऑलिम्पिकमधून माघार घेऊ नये म्हणून एआयटीए (AITA) नं आपल्या नावाचा वापर केला आणि पेसला आश्वासन दिलं. तर भुपतीनं बोपन्नाबरोबर खेळायला मिळावं म्हणून आपल्या मिक्स डबल्समधील जोडीचा बळी दिल्याचा आरोप सानियानं भूपतीवर केला. तर पेसनं लेखी आश्वासन मागणं आणि कमी रँकिंगच्या खेळाडूबरोबर खेळणार नाही असं म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं असल्याचं सानियानं स्पष्ट केलयं. सानिया वाईल्ड कार्ड मिळाल्यामुळे रुश्मी चक्रवर्तीबरोबर डबल्समध्ये खेळणार आहे. तर पुरष सिंगल्ससाठी सोमदेव देवबर्मनलाही वाईल्ड कार्ड मिळालंय.

close