‘मंत्रालयाच्या 6,7व्या मजल्यावरचं अनधिकृत बांधकाम हटवा’

June 28, 2012 5:12 PM0 commentsViews: 6

28 जून

मंत्रालयाला भीषण आग लागून आज ठिक तिसरा आठवडा उजाडला आहे. या आगीबद्दल राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं मंत्रालयाच्या आगीबाबतचा आपला अहवाल तयार केला. मंत्रालयाच्या वरच्या दोन मजल्यांवर बांधकामासाठी, ज्वालाग्रही सामग्रीचा जास्त वापर करण्यात आला होता. असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. हा अहवाल आता सरकारला सादर करणार आहे. मंत्रालयाच्या आगीत जळालेल्या सहाव्या आणि सातव्या मजल्यावरचं अनधिकृत बांधकाम हटवण्याची शिफारस नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍथोरिटीने आपल्या अहवालात केली असल्याची माहिती आयबीएन लोकमतच्या हाती लागली आहे. जळालेल्या मजल्यांवर ज्वलनशील वस्तुंचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आल्याचंही या समितीने म्हटलंय. स्ट्रक्चरल ऑडिट करणार्‍या प्रा. रवी सिन्हा आणि प्रा. आलोक गोयल या मुंबई आयआयटीच्या दोन तज्ज्ञांनी आपला अहवाल नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटला सादर केला.

या अहवालात नेमके कोणते महत्वाचे मुद्दे

मंत्रालयाला लागलेल्या आगीमुळे जळालेल्या मजल्यांचं कोणतंही स्ट्रक्चरल डॅमेज झालेलं नाहीये, असं या अहवालात म्हटलंय. तसेच मुळं इमारतीचा भाग नसलेलं आणि नंतर बांधलेलं सहाव्या मजल्यावरचं बांधकाम आणि सातव्या मजल्यावरचं बांधकाम पुर्णपणे हटवण्याची महत्वाची शिफारस या व्दिसदस्यीय समितीने केली. जळालेल्या मजल्यांवर ज्वलनशील वस्तुंचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आल्याचंही या समितीने म्हटलंय. या प्रकारच्या ज्वलनशील वस्तुंचा वापर मुळ इमारतीत फारसा केलेला नसल्याचंही या समितीच्या निदर्शनास आलंय. आता हा अहवाल नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथोरिटी येत्या दोन दिवसात राज्य सरकारला सादर करण्याची शक्यता आहे.

close