अतिरेकी अबूवर मुंबई पोलिसांच्या ताबा नाहीच

June 27, 2012 11:17 AM0 commentsViews: 2

27 जून

मुंबई हल्ल्यातील आरोपी अबू जुंदल याला दिल्लीत अटक केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांचं पथक दिल्लीत गेलंय. पण अबू जुंदलचा ताबा मुंबई पोलिसांना मिळण्यास आता आणखी उशीर होणार आहे. अबूची चौकशी अजून पूर्ण झाली नसल्यानं त्याला लगेच मुंबई पोलिसांच्या ताब्यात देता येणार नाही अशी माहिती दिल्ली पोलिसांनी तीस हजारी कोर्टात दिली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसानी कोर्टात पुन्हा अबूला ताब्यात देण्याची विनंती करणारा अर्ज केला आहे. आता या अर्जावर पाच जुलैला सुनावणी होणार आहे.

close