म्हाडाच्या घरांसाठी गिरणी कामगारांचा रास्ता रोको

June 28, 2012 10:01 AM0 commentsViews: 2

28 जून

गिरणी कामगारांच्या 6 हजार 925 घरांसाठी आज म्हाडातर्फे लॉटरी सुरू आहे. पण या लॉटरीला गिरणी कामगारांच्या 9 पैकी 6 संघटनांनी विरोध करत ही लॉटरी आज उधळून लावण्याचा इशारा दिला होता. पण पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवल्यानं या कामगारांनी वांद्रे इथं एसव्ही रोडवर रास्ता रोको आंदोलन केलं. सर्व 1 लाख 48 हजार कामगारांना मोफत घरं मिळाली पाहिजे अशी मागणी या कामगारांनी यावेळी केली. अखेर गिरणी कामगारांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी चर्चेसाठी बोलावल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. दरम्यान, 19 गिरण्यांमधील जागांवर बांधण्यात आलेल्या 6 हजार 925 घरांसाठी म्हाडाची लॉटरी सकाळपासून सुरू आहे. पहिल्या सत्रात 3 हजार 438 घरांसाठी लॉटरी झाली. तर आता दुसर्‍या उर्वरित घरांसाठी लॉटरीला सुरूवात झाली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही लॉटरी चालणार आहे.

close