बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी डॉ.मानेला अटक

June 27, 2012 8:20 AM0 commentsViews: 2

27 जून

अहमदनगरमधल्या राहुरीत डॉ. स्वप्नील मानेला अटक करण्यात आलंय. 21 एप्रिलला त्याच्या हॉस्पिटलमध्ये स्त्रीगर्भाची तपासणी करून गर्भपात करण्यात आला होता. लेक वाचवा वेबसाईटवर याबाबतची निनावी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार राहुरीच्या पोलिसांनी आणि तहसीलदारांनी डॉ. मानेच्या हॉस्पिटलची तपासणी केली. त्यावेळी संशयास्पद पुरावे आढळल्यानं तिथल्या सोनोग्राफी सेंटरला सील करण्यात आलं होतं. डॉ. मानेला राहुरी पोलिसांनी अटक केली.

close