यवतमाळमध्ये पं. हरिप्रसाद चौरसियांचं बासरीवादन

November 26, 2008 5:02 AM0 commentsViews: 6

26 नोव्हेंबर, यवतमाळ प्रशांत कोरटकर हिवाळ्याच्या सुरुवातीलाच यवतमाळकरांना ऊब मिळाली ती पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीच्या सुरांची. जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्ताने यवतमाळमध्ये ' स्वरश्रद्धांजंली ' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची खास उपस्थिती आणि त्यांचं बासरीवादन लक्षवेधी ठरलं. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंडितजी पहिल्यांदाच यवतमाळला आले. इथे बासरी वाजवल्यानंतर वृंदावनाचा आनंद मिळाल्याची भावना पंडितजींनी व्यक्त केली. पंडितजींची बासरी आणि त्रिलोक गुर्टुंचा तबला यांच्या जुगलबंदीला श्रोत्यांची भरभरून दाद मिळाली.

close