‘माझा मुलगा निर्दोष आहे’

June 28, 2012 10:36 AM0 commentsViews: 1

28 जून

माझा मुलगा निर्दोष आहे तो अतिरेकी नाही अबूला फसवला जातं आहे असा दावा मुंबई हल्ल्यातील आरोपी अबू जुंदल उर्फ जबिउद्दीनची आई रेहाना बेगम यांनी केला. दिल्लीत अटक करण्यात आलेली व्यक्ती जबिउद्दीनच आहे का याची खातरी करण्यासाठी अबूची आणि आमची समोरासमोर भेट घडवावी अशी मागणीही त्याच्या आईनं केली. आतापर्यंत पोलिसांनी डीएनए (DNA) टेस्ट केली नसल्याचंही त्याच्या आईनं स्पष्ट केलं. तसेच मुंबई हल्ला प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी अबूच्या आईनं केली. सोमवारी अबू जुंदल दिल्ली विमानतळावर अटक करणयात आली. अबू हा लष्कर-ए-तोयबाचा महत्वाचा सदस्य असल्याचं तपासातून समोर आलं आहे. 26/11 चा हल्ला झाला होता तेंव्हा अबू पाकिस्तानच्या कंट्रोल रुममधून अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांना सुचना देत होता. या हल्ल्यात आपला सहभाग असल्याचंही अबूने कबुली दिली आहे. अबू हा मुळचा बीडचा रहिवासी आहे. त्याला अटक केल्यानंतर त्याचं परिवार गायब झाले होते बीडयेथील दोन्ही घरं बंद होती. पण आता त्याचे कुटुंबीय मीडियासमोर आले.

close