जमिनीच्या वादावरून आदिवासी-गावकर्‍यांमध्ये हाणामारी

June 27, 2012 11:25 AM0 commentsViews: 8

27 जून

जबरदस्तीनं शेतजमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार्‍या आदिवासी आणि गावकर्‍यामध्ये जोरदार हाणामारी झाली. अमळनेर तालुक्यातील झाडी गावातील गावकर्‍यांवर आदिवासींनी केलेल्या जोरदार दगडफेकीत 4 गावकरी जखमी झाले आहे. तर अनेक घरांची नासधूस झाली आहे. या हाणामारीला नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना हवेत 5 राऊंड फायर करावे लागले. दरम्यान, घटनास्थळाची जिल्हाधिकार्‍यांसह,पोलीस अधीक्षक यांनी पाहणी केली आहे. वातावरणात तणाव असल्यानं मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला आहे.

close