प्रणवदा घेणार बाळासाहेबांची भेट ?

June 29, 2012 12:15 PM0 commentsViews: 5

29 जून

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या भूमिकेविरोधात जाऊन शिवसेनेनं यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा जाहीर केला. आता शिवसेनेनं केलेल्या सहकार्यबद्दल आभार मानण्यासाठी प्रणव मुखर्जी स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. प्रणवदांनी काल गुरुवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला. यावेळी प्रणवदांना पाठिंबा देणार्‍या पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. पण शिवसेनेचं मात्र यावेळी कुणीही हजर नव्हतं.

19 जून रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जी योग्य उमेदवार असल्याचं सांगत त्यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केलं होतं. प्रणव मुखर्जी हे योग्य उमेदवार असून कोणीही मान्यात तलवार नसताना वीर असल्याचा आव आणू नये असा टोलाही शिवसेनाप्रमुखांनी भाजपला लगावला. तसंच कोणीही शिवसेनेवर फसवणुकीचा आरोपही करु नये असा अप्रत्यक्ष इशाराही शिवसेनाप्रमुखांनी दिला होता. याअगोदरच्या दिवशी प्रणव मुखर्जी यांनी बाळासाहेबांना फोन करुन पाठिंब्या देण्यासाठी विनंती केली होती.

close