सिंधुदुर्गात कळणे मायनिंगचा काजू बागेला फटका

June 28, 2012 11:56 AM0 commentsViews: 4

28 जून

सिंधुदुर्गातल्या कळणे मायनिंगचा फटका आता तिथल्या शेतकर्‍यांना बसतोय. पावसामुळे या मायनिंगची सगळी माती इथल्या काजू बागांमध्ये जाऊन काजूची झाडं या मातीत गाडली गेली आहे. त्यामुळे इथल्या शेतकर्‍यांचं उत्पन्नाचं एक साधनच नष्ट होऊ लागलंय. तसेच शेतीतही मोठ्या प्रमाणात माती जाऊ लागल्यामुळे इथली शेतीही आता नापिक होऊ लागलीय. गावकर्‍यांच्या घरजवळही ही माती येऊ लागल्यामुळे पावसाळ्यात या घरांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही मायनिंग कंपनीवर आत्तापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्यामुळे मायनिंगमुळे होणारं आमचं नुकसान कोणा भरून देणार असा सवाल शेतकरी विचारत आहे.

close