‘पाकने दिला होता अबूला आश्रय’

June 29, 2012 12:23 PM0 commentsViews: 3

29 जून

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला दहशतवादी अबू जुंदल उर्फ जबिउद्दीन अन्सारी नवनवे खुलासे करतोय. अबू जुंदलला पाकिस्ताननेच आश्रय दिल्याचे आतापर्यंत झालेल्या चौकशीतून उघड झालं आहे. गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज शुक्रवारी ही माहिती दिलीय. 26/11 च्या हल्ल्यानंतर वाढत्या दबावामुळे लष्कर-ए-तोएबाचं हेडक्वार्टर पाकव्याप्त काश्मीरमधल्या दुलाई इथे हलवल्याचंही त्यानं सांगितलंय. तुरुंगात असताना झकीर-ऊर-रहमान याच्याशी भेटलो होतो. पाकिस्तानात गेल्यावर रावळपिंडीमध्ये कार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असल्याचं त्यानं तपास अधिकार्‍यांना सांगितलंय. अबूचं मूळ नाव जबिउद्दीन अन्सारी असल्याचंही त्याच्या चौकशीतून उघड झालंय.

close