पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल

June 28, 2012 11:49 AM0 commentsViews: 4

28 जून

मराठवाड्यात पाऊस न पडल्यानं मृग आणि रोहिणी नक्षत्र कोरडेचं गेलेत. त्यामुळे जालन्यातही शेतकर्‍यांसमोर दुबार पेरणीबरोबरच चाराटंचाईचं भीषण संकट उभं राहिलं आहे. तसेच रोपट्यांना हाताने पाणी द्यायची वेळ आलीय. पाऊस न पडल्याने जनावरांसाठी लागणारा कडबासुद्धा शेतकर्‍यांना विकत घ्यावा लागतोय. त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. एकूणच जालन्याच्या शेतकर्‍यासमोर अगोदर महागडे बियाणे, रासायनिक खते त्यावर दुबार पेरणीचे संकट आणि आता जनावरांसाठीचा चारा प्रश्न यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचं चित्र मराठवाड्यात दिसत आहे.

close