इटलीचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश

June 29, 2012 12:38 PM0 commentsViews: 4

29 जून

इटलीने युरो कप फुटबॉल स्पर्धेत जर्मनीचा 2-1 असा पराभव करीत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. बाल्टोली हा इटलीच्या विजयाचा हिरो ठरला. मॅचच्या पहिल्या हाफमध्येच त्याने इटलीला निर्णायक आघाडी मिळवून दिली. पेनल्टी किकवर गोल करत जर्मनीने ही आघाडी कमी केली खरी पण ते पराभव काही टाळू शकले नाहीत. गेल्या 17 वर्षात जर्मनीला एकदाही महत्वाच्या स्पर्धेत इटली विरूध्द विजय मिळवता आलेला नाही. इटलीची आता फायनलमध्ये गाठ पडेल वर्ल्डचॅम्पियन स्पेनशी. स्पेनने पोर्तुगालचा पराभव करीत फायनलमध्ये यापूर्वीच धडक मारलीय.

close