पेट्रोल 2 रुपये 46 पैशांनी स्वस्त

June 28, 2012 2:22 PM0 commentsViews: 4

28 जून

महागाईनं होरपळलेल्या जनतेला आता थोडा दिलासा मिळणार आहे. आज मध्यरात्रीपासून पेट्रोलचे दर अडीच रुपयांची स्वस्त होणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज आपला निर्णय जाहीर करत जनतेला दिलासा दिला आहे. आजच्या कपातीमुळे देशाच्या राजधानी दिल्लीत पेट्रोल 67.78 रुपयांनी उपलब्ध होणार आहे. राज्याराज्यात व्हॅटमुळे पेट्रोलच्या दरात तफावत असणार आहे. मुंबईत पेट्रोल 3 रुपये 10 पैशांनी स्वस्त होणार असून आज मध्यरात्रीपासून पेट्रोल 73.35 रुपये दरांने मिळणार आहे. त्यापाठोपाठ पुणे 74.02, नागपूर 76.14, ठाणे 76.89, नाशिक – 73.79 आणि सोलापूर 76.88 रुपयांनी मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड तेल्याच्या किंमती कमी झाल्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेट्रोलचे दर कमी होणार अशी शक्यता होती. मागिल महिन्यात 23 मे रोजी साडेसात रुपयांनी पेट्रोल दरवाढ करुन सर्वसामान्याचे कंबरडं मोडलं होतं. जनतेला दिलासा देत 2 जून रोजी पेट्रोलच्या दरात 2 रुपायांनी कपात करुन मल्लमपट्टी करत आली होती. आता 2.46 रुपयांनी कपात करुन एकाच महिन्यात दरात 4.46 रुपयांनी कपात केली आहे.

close