स्पेन युरो कपच्या फायनलमध्ये

June 28, 2012 4:21 PM0 commentsViews: 1

28 जून

युरो कपमध्ये स्पेननं सलग दुसर्‍यांदा फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनलमध्ये स्पेननं ख्रिस्तिआनो रोनाल्डोच्या पोर्तुगालचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव केला आहे. युक्रेनच्या डॉनबास अरेना स्टेडिअममध्ये खेळवण्यात आलेल्या या मॅचमध्ये दोन्ही टीमनं जबरदस्त खेळ केला. निर्धारित वेळेत दोन्ही टीमला एकही गोल करता आला नाही. स्पेननं काही आक्रमक चाली रचत गोलपोस्टवर धडक मारली. पण गोल करण्यात त्यांना अपयश आलं. पोर्तुगालचा गोलकिपर पॅट्रिकोनं स्पेनचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. पोर्तुगालचा कॅप्टन ख्रिस्तिआनो रोनाल्डोनंही गोल करण्याची एक चांगली संधी हातातून घालावली. अखेर मॅचचा निकाल पेनल्टी शुटआऊटवर लागला. स्पेननं चार गोल करत फायनलमध्ये धडक मारली.

close