मेहतर समाजाचे कामबंद आंदोलन मागे

June 29, 2012 1:50 PM0 commentsViews: 2

29 जून

पंढरपुरात हातानं मैला साफ करणार्‍या मेहतर समाजानं आपलं कामबंद आंदोलन मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या समाजातील लोकांना घरांचं आश्वासन दिलंय. पण हातानं मैला साफ न करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी या समाजाला कोणतंही आश्वासन दिलेलं नाही. ऐन आषाढीच्या तोंडावर हे कामबंद आंदोलन झाल्यानं पंढरपुरात घाणीचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे इथं आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. वारकर्‍यांना त्रास नको म्हणून त्यांनी आंदोलन मागे घेतलंय. पण हातानं मैला साफ करणार नाही या मेहतर समाजाच्या मागणीवर कोणताही निर्णय झालेला नाही. मेहतर समाजही हाताने मैला साफ करणार नसल्याच्या निर्णायवर ठाम आहे.

close